पोस्ट 2
एखाद्या व्यसनातून बाहेर पडायचं असल्यास
त्याच्यापासून खूप दूर जावं वगैरे बरंच काही लहानपणी ऐकलेलं आहे. त्यादृष्टीने थोडे
दिवस नेटसर्च केला. व्हॉट्सॅपपासून दूर जाण्यासाठी काय करावे याचे बरेच प्रयत्न केले.
खूप सारे ग्रूप सोडले (लोकांनी परतपरत अॅड केलं हा वेगळाच ताप) डेटा युसेज पॅटर्न
बदलला. नोटिफिकेशन सेटिंग्ज बदलली तरीही, ऑबसेशन मात्र थांबेना. उलट ते अधिकच वाढत असल्यासारखं
जाणवू लागलं.
याला थोडंसं माझं कामाचं स्वरूपही
कारणीभूत आहे. मी वर्क फ्रॉम होम करते. याचा अर्थ जरी मी इतरांसाठी सहा सात तास पीसीसमोर
बसले तरी मी घरात एकटी असते. माझे कामाचे तास फ्लेक्झिबल आहेत. हाती घेतलेले काम मी
दिलेल्या डेडलाईनमध्ये पूर्ण करून देणे अपेक्षित आहे. त्यासाठी माझ्यावर कुणी बॉस नाही
अथवा लक्ष ठेवायला कुणी नाही. दिवसातले अलमोस्ट दहा तास मी घरी एकटी असते. यावेळी मन
रमवायला माझ्याकडे इतर काहीही साधन नाही. गावाबाहेर राहत असल्यामुळे सतत घराबाहेर पडता
येत नाही. जे मित्रमैत्रीण आहेत ते स्वत: अत्यंत बिझी राहणारे आहेत. त्यामुळे सतत भेटता
येऊ शकत नाही. परिणामी, “कनेक्ट” राहण्यासाठी मला हा मार्ग सोयीचा
आहे.
त्यामुळे व्हॉट्सॅपवर चकाट्या
पिटणे हा आवडीचा उद्योग होऊन बसला. त्यात परत दिवसभर देशातले मित्रमैत्रीण, रात्री परदेशांतले असे करत बोलणं सतत चालूच राहत होतं. बरं, यातलं कुठलंही बोलणं हे
“संवाद” या स्वरूपाचं नव्हतं, अत्यंत बेसिक स्वरूपाचं काय चालूये, काय करतेस, जेवण झालं का टाईप. प्रत्यक्ष भेटलेल्या अनेक मित्रमैत्रीणींशी होणारा चांगला प्रभावी संवाद या अशा गप्पांमधून थांबला होता.
“संवाद” या स्वरूपाचं नव्हतं, अत्यंत बेसिक स्वरूपाचं काय चालूये, काय करतेस, जेवण झालं का टाईप. प्रत्यक्ष भेटलेल्या अनेक मित्रमैत्रीणींशी होणारा चांगला प्रभावी संवाद या अशा गप्पांमधून थांबला होता.
खरं सांगू का? मेडीकली लोक हे मानतील की नाही माहित नाही, पण मला व्यक्तीश:
या सततच्या संवादामुळे माझा मेंदू निर्बुद्ध होत असल्यासारखं वाटत होतं. यापूर्वी मित्रमैत्रीणींसोबत रात्री अपरात्री जागून प्रत्येक्ष किंवा फोनवर
अनेकदा तासनतास गप्पा मारल्या होत्या, त्यानंतर मनाला ताजंतवानं
वाटायचं पण व्हॉट्सॅपच्या गप्पानंतर (ज्या कधी संपत नाहीत. TTYL म्हणत चालूच राहतात आणि झोल होतात. त्यावर आपण सविस्तर लिहू) मन गांजून गेल्यासारखं
मला तरी वाटतं. शिवाय अजून एक भानगड होते, आपल्याला काहीतरी चमकदाच
छान सुचलेलं असतं आपण त्यावर विचार करत असतो. आणि अचानक मोबाईल शिट्टी मारतो आणि आपण
स्क्रीन अनलॉक करून वाचतो. कुणीतरी काहीतरी पाचकळ पीजे पाठवलेला असतो. वरकरणी हसू येतं,
पण त्याचवेळी मनामध्ये उभरत असलेली कल्पना मरूनदेखील जाते. एक लेखक म्हणून
हा माझ्यादृष्टीने सगळ्यांत मोठा तोटा होता आणि आहे. या Constant Communnication
सतत संवादामुळे बुद्धीवर एक तवंग साचत जातो. आपण फ्रेश विचार करूच शकत
नाही, असं मला हल्ली वाटू लागलं होतं.
आणि म्हणून, आय अॅम अल्कोहोलिक हे जसं लोक कबूल करतात तसं आय अॅम व्हॉट्सॅप अॅडिक्ट
हे स्वत:शी कबूल केलं आणि हे व्यसन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. काहीही
कामी आलं नाही म्हणून अखेर अॅप डिलिट केले.
आता मी सध्यातरी सुखांत आहे.
चार दिवस होऊन गेले आहेत. हळूहळू इरिटेशन वाढत चालले आहे. (हे होणार याची कल्पना आहे.
आणि म्हणून मनाची तयारीदेखील चालू आहे. त्यावर नंतर पुढच्या भागात लिहेन्) अर्थात
या चार दिवसांमध्ये कामासाठी अथवा वैयक्तिक स्वरूपाच्या कुठल्याही “आवश्यक संवादा”मध्ये
काहीही फरक पडलेला नाही.
फॅमीली ग्रूप अचानक सोडल्यामुळे
काळजीत पडलेल्या एका कझिनने आज फोन केला. आम्हाला भेटून अलमोस्ट पंधरा वर्षे होऊन गेलीत.
तो परदेशी असतो. इतके दिवस व्हॉट्सॅपवर मेसेजामेसेजी इतपतच संवाद होता. आज त्याने चक्क
कॉल केला. तासभर गप्पा मारल्या. जरा बरं वाटलं.
People are noticing
ReplyDeleteThat you're missing
At times questioning
Eventually stop peeping.
On your life got firm hold
Decision was indeed bold
Few might think you're cold
A new life for you will unfold.
Best policy is of conversation
Gives one great satisfaction
Avoids unnecessary confusion
I might very well think of this option.