Posts

पोस्ट 3

POST 3 चला , आता व्हॉट्सॅप डीलीट करून अलमोस्ट पाच दिवस झाले. नव्याची नवलाई संपत आली. काल एका मैत्रीणीचा फोन आला. ही माझी ऑनलाईन मैत्रीण. आम्ही प्रत्यक्षात भेटलेलो नाही , पण फेसबुक आणि व्हॉट्सॅपवर चिक्कार गप्पा मारल्यात. माझ्याकडे आज गवारीची भाजी आहे इथपासून ते तिच्या नवर्‍याला बाथरूमसमोर पायपुसणं टाकलेलं आवडत नाही इथवर सगळी माझ्याबद्दल तिच्याकडे आणि तिच्याबद्दल माझ्याकडे माहिती आहे. या माहितीचा नक्की काय उपयोग माहित नाही. पण माहिती तरी आहे!! तर अशी ही मैत्रीण माझ्यासोबत बराच वेळ बोलत होती. खूप गप्पा झाल्यावर म्हणाली , “ तुझं बरोबर आहे. तू योग्य डीसीजन घेतलास. तुझ्यासारखे खूप सारे लोक असतील , त्यांच्यापर्यंत या अशा पॉझिटिव्ह गोष्टी पोचल्या पाहिजेत. एखादा ना हॅशटॅग चालू करायला हवाय. जेणेकरून लोकांना सोशल मीडीयचे दुष्परिणाम कळतील” बोलताना तिला अजिबात यामधला विनोद लक्षात आला नाही. तिला कदाचित तो समजलाही नसता. दारूच्या दुकानामध्ये बसून दारूचे घोट घेत अल्कोहोलिक अ‍ॅनोनोमसची मीटिंग घेणं ही कल्पना किती क्रांतीकारी आहे तितकीच #StayAwayFromSocialMedia असा हॅशटॅग चालवून सोशल मीडीयाचे...

पोस्ट 2

एखाद्या व्यसनातून बाहेर पडायचं असल्यास त्याच्यापासून खूप दूर जावं वगैरे बरंच काही लहानपणी ऐकलेलं आहे. त्यादृष्टीने थोडे दिवस नेटसर्च केला. व्हॉट्सॅपपासून दूर जाण्यासाठी काय करावे याचे बरेच प्रयत्न केले. खूप सारे ग्रूप सोडले (लोकांनी परतपरत अ‍ॅड केलं हा वेगळाच ताप) डेटा युसेज पॅटर्न बदलला. नोटिफिकेशन सेटिंग्ज बदलली तरीही , ऑबसेशन मात्र थांबेना. उलट ते अधिकच वाढत असल्यासारखं जाणवू लागलं. याला थोडंसं माझं कामाचं स्वरूपही कारणीभूत आहे. मी वर्क फ्रॉम होम करते. याचा अर्थ जरी मी इतरांसाठी सहा सात तास पीसीसमोर बसले तरी मी घरात एकटी असते. माझे कामाचे तास फ्लेक्झिबल आहेत. हाती घेतलेले काम मी दिलेल्या डेडलाईनमध्ये पूर्ण करून देणे अपेक्षित आहे. त्यासाठी माझ्यावर कुणी बॉस नाही अथवा लक्ष ठेवायला कुणी नाही. दिवसातले अलमोस्ट दहा तास मी घरी एकटी असते. यावेळी मन रमवायला माझ्याकडे इतर काहीही साधन नाही. गावाबाहेर राहत असल्यामुळे सतत घराबाहेर पडता येत नाही. जे मित्रमैत्रीण आहेत ते स्वत: अत्यंत बिझी राहणारे आहेत. त्यामुळे सतत भेटता येऊ शकत नाही. परिणामी , “ कनेक्ट” राहण्यासाठी मला हा मार्ग सोयीचा...

पोस्ट 1

हे लिहायचं की नाही इथपासून सुरूवात आहे खरंतर. पण म्हटलं , किमान नोंदवून ठेवू या. काही नाही तर हाती एक नोंदणी तरी राहील. प्रयोग यशस्वी झाला तरी , अयशस्वी झाला तरी. तर सांगण्याचा उद्देश इतकाच की , कंप्लीट 36 तास झाले आहेत. मी फेसबुक आणि व्हॉट्सॅप दोन्ही डीलीट करून. वापरावर कंट्रोल ठेवावा , फार त्यात गुंतू नये हे सल्ले माझ्यासाठी आता उपयोगाचे नव्हते हे कधीच लक्षात आले होते. त्यासाठी अधूनमधून फेसबुक डीअ‍ॅक्टीव्हेट करून प्रयोग करून पाहिला होता. पण फेसबुकपेक्षा व्हॉट्सॅप व्यसन अधिक वाईट होते. अजूनही आहे. आताही पूर्ण त्यामधून बाहेर आले आहे , असे आपण म्हणूयाच नको. अवघे काही तास तर झालेत… इरादा किमान वर्षभर तरी ही दोन अ‍ॅप्स बिल्कुल न वापरणे आणि वापरले तरी केवळ कामानिमित्त असा आहे. तर ही अनुदिनी त्या इराद्यासाठी… रोजचा हा प्रवास आणि संघर्ष तुमच्यासमोर मांडण्यासाठी. तिथवर पोचण्याआधी , मुळात हे पाऊल उचलावे का लागले त्याबद्दल थोडेसे… सोशल मीडीया आणि मी एकाच वयाचे. माझं टीनेजर चालू झालं तेव्हा याहू ग्रूपशी परिचय झाला. अनोळखी व्यक्तींशी इंटरनेटमधून संपर्क साधण्याचा तो पहिला अनुभ...